पूर्वीचा काळ बाबा,
खरंच होता चांगला,
साधे घरं साधी माणसं,
कुठे होता बंगला ?
घरं जरी साधेच पण,
माणसं होती मायाळू,
साधी राहणी चटणी भाकरी,
देवभोळी अन श्रद्धाळू.
सख्खे काय चुलत काय,
सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो,
आपुलकीने भेटायचे.
पाहुणा दारात दिसला की,
खूपच आनंद व्हायचा हो,
हसून खेळून गप्पा मारून,
शीण निघून जायचा हो.
श्रीमंती जरी नसली तरी,
एकट कधी वाटलं नाही,
खिसे फाटके असले तरीही,
कोणतंच काम रुकलं नाही.
उसनं पासनं करायचे पण,
पोटभर खाऊ घालायचे,
पैसे आडके नव्हते तरीही,
मन मोकळं बोलायचे.
कणकेच्या उपम्या सोबत,
गुळाचा शिरा हटायचा,
पत्रावळ जरी असली तरी,
"बायको सूंदर मैत्रीण असते"
पारिजातकाचा सुवास बायको असते,
निरपेक्ष प्रेमाचा सागर बायको असते,
नवऱ्याची प्रेरणा बायको असते,
जीवनाची अर्धनागिणी बायको असते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासूसासऱ्यास आई वडील मानते,
नवऱ्यात परमेश्वर पहाते,
सारे आयुष्य सासरसाठी वाहते,
संसारात स्वतःलाही विसरते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
आल्या जरी असंख्य काटेरी वाटा,
तरी ती धीराने सामोरी जाते,
नवय्राच्या सुख दुःखात साथ देते,
घराची ती तुळस होते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
कधी हसते, कधी रुसते,
कधी उगाच रागानी पहाते,
कधी आसवांच्या सागरात,
नवऱ्यासोबत भिजते,
कधी सुखाचे चांदणं टिपते,
खरंच बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासरचे गुण जगभर गाते,
बायकोच सांभाळते सर्व नाते,
घरात स्वर्ग तिच करते,
मनातील दुरावे तिच संपवते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
माहेराच्या आठवणीत क्षणभर डोळे ओलावते,
मनातील दुःख तिचे कोणी का जाणते?,
संसारास तीच्या अमूल्य मानते,
प्रत्येक जन्म ह्य...
Busy Busy काय करता
वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो
संसाराचा गाडा
खूप काम, रजा नाही
मिटिंग, टार्गेट,फाईल
अरे वेड्या यातच तुझं
आयुष्य संपून जाईल
नम्रपणे म्हण साहेबांना
दोन दिस रजेवर जातो
फॉरेन टूर राहिला निदान
जवळ फिरून येतो
आज पर्यंत ऑफिससाठी
किती किती राबलास
खरं सांग कधी तरी तू
मनाप्रमाणे जगलास ?
मस्त पैकी पाऊस झालाय
धबधबे झालेत सुरू
हिरव्यागार जंगला मध्ये
दोस्ता सोबत फिरू
बायकोलाही म्हण थोडं
चल येऊ फिरून
डार्लिंग डार्लिंग खेळू आपण
पुन्हा होऊ तरुण
पंजाबी घाल, प्लाझो घाल
लाऊ द्या लाल लिपस्टिक
बायकोला शब्द द्यावा
करणार नाही किटकीट
पोळ्या झाल्या की भाकरी
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी
गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या
दोघांच्याही हातात येतील
म्हातारपणाच्या काठ्या
जोरजोरात बोलावं लागेल
होशील ठार बहिरा
मसणात गवऱ्या गेल्यावर
आणतो का तिला गजरा ?
तोंडात कवळी बसवल्यावर
कणीस खाता येईल का ?
चालतांना दम लागल्यावर
डोंगर चढता येईल का ?
अरे बाबा जागा हो
टाक दोन दिवस रजा
हसीम...
का कुणास ठाऊक आठवण येत होती क्षणोक्षणी ।।
व्याकुळतेने डोळ्यातून तरंगत होते पाणी ।।
त्या मधुर स्वरांची व हास्याची होतीच आणिबाणी ।।।
दुर असूनही सुगंध देणारी सतत आठवत होती ती रातराणी ।।
काय सांगावे हे नाते स्नेह बंधनाचे।।।
विरह देखील देतो सुगंध चंदनाचे।।।
तु पैल तिरावर मि ऐल तिरावर।।। या सुगंधाचे वेड घेतले मि माझ्या उरावर।।। तुझ्याच मैत्रीने बसला मैत्रीवर विश्वास ।।।
मि पण या कसोटीवर उतरणार जोपर्यंत आहे शेवटचा श्वास।।।
तुझ्याच त्या स्मित हास्याने मन होते उल्हास ।।।तो स्वर तोच खरा ध्यास।।।तुझे गोड शब्द ऐकण्यासाठी मन झाले होते व्याकूळ ।।।असे वाटत होते राधाकृष्ण विना सुन्न झाले होते गोकुळ।।।
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली ....
काय सांगू मला कशी फ्रेंड्रिक्वेस्ट पाटवली
चेंगरा चेंगरीच्या गर्दीत
अचानक माझ्या फ्रेंड्स लिस्ट शिरली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली....
बोलता बोलता ती अचानक
काळजात उतरली
पहिल्याच दिवसा पासून तिने
शब्दांची मेहफिल जमवली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली....
आधी वाटलं मस्करी
मग माझ्या साठी रुसली
माझे दुख हाताळताना
तिची हि पापणी भिजली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली....
अनोळखी वर विश्वास ठेवून
तिने अचानक तिचेही दुख मांडली
हळू हळू मनात ह्या ती
मैत्रीच घर करून बसली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली.....
खूप ठेवते विश्वास माझ्यावर
क्षणा क्षणाला ती ढळली
घरचे त्रास सोसून देखील
गालात फक्त ती हसली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली ...
मी देखील आता साथ देयीन
ह्यानेच ती खूप बहरली
अखेरच्या श्वासा पर्यंत राहीन सोबत
एवढंच बोलून पाणावली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली.....
आठवलं मला काल......
तुझ्या मिठीतला तो गोडवा
आपल्या आपलेपणाचा तो स्पर्श
तुझ माझ्यासाठीच ते खोट हसणं
तुझ माझ्यावर खोट खोट ते रुसणं
आठवलं मला काल......
तुझं चोरून मला भेटायला येणं
तुझ्या गाडी ने घेऊन ते फिरणं
रुबाबदारपणाने तुझ ते राहणं
तुझ्या हातात हात माझा ऐटीत घेऊन फिरणं
आठवलं मला काल.....
काट्यातून ते फुल तु माझ्यासाठी तोडून आणणं
देवाकडे सतत माझ्यासाठी प्रार्थना करणं
तासन तास तुझ माझ्यासाठी वाट पाहत राहणं
माझ्यासाठी तुझं ते झुरण
आठवलं मला काल....
तुझं अचानक मला सोडून ते जाणं
तुझं माझ्यासोबत आता कधीच नसण
माझं तुझ्या प्रेमात उगाच ते फसणं
आठवणीत मग तुझ्याच मी जळत ते बसण.....
मी तुझी आज पण वाट बघत आहे..
का ग मला सोडुन का गेली तु..
आज पण मि तुझा साठी खुप रडतोय..
हे तुला नाही समझणार...
मला तिला PrOpose करायचय...
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू ..कि
माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू ...
.
...... मला तिला सांगायच्ya तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही ...
माझ्या स्वप्नातली परीम्हणू .. कि ..
स्वर्गातली अप्सरा म्हणू ..
.
मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही ...
तू फक्त माझी म्हणू .. कि..
मी फक्त तुज म्हणू ...
.
मला तीचाशीच लग्न करायचय
कसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि..
तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशील
का म्हणू ..
.
मला फक्त तीचासाठी जगायचं
कसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकत
नाही म्हणू ..कि ...
तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू ..
म्हणू तर काय म्हणू ..
तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसला तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,
तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलास की मला करमत नाही
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही
माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते जगण
जगणंच वाटत नाही..!!!
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
असतेस जेव्हा तु माझ्याबरोबर
बेधुंद वागतो तेव्हा मी खरंतर
तु नसलीस की मग तुझ्या आठवनींना उधाण येई
तुझ्या आठवनीं सोबत
दिवस सरतो सहज पण ती कळोखी रात्र सरत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
दिवस उतरावा तसे तुझे
विचार मनात उतरतात
हळुच मग मनाच्या
हळव्या कोन्यातली नाजुक तार छेडतात
तुझ्या त्या विचारांनी मी मात्र घायाळ होई
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
एकटा वाटेवर चालतानाही
तुझी सोबत सतत जाणवी
मागे वळुण पाहताना
माझ्याच सावलीत मी नेहमीच तुझं चित्र पाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु समोर असल्यावर तुझ्या डोळ्यात
मी स्वत:चे प्रतीबिंब पाही
त्या प्रतीबींबातही मी तुझी साथ शोधण्याचा प्रयत्न करी
पण नेमकं तेव्हाच तु पापण्या मिटतेस
का ? गं अशी मला तु नेहमीच छळतेस
पण त्या छळण्याने मात्र कधीही त्रास होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तु जवळ असल्यावर तुला मी स्पर्श करु पाही
तुला मी स्वत:च्या प्रेमळ मीठित घेउ पाही
पण देव जाणे का ? माझं कधी धाडसंच होत नाही
जवळ असुनही कसला हा दुरावा
आता खरच हे सगळ सहन होत नाही
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............??
तुला कायं म्हणावं काहीच कळत नाही...............?
तुझ्या ओंजळीतल चांदणं
कधी पाहीलयसं का निरखुन
प्रत्येक तारा देतोय साद
त्या जडवलेल्या कोंदणीतुन निखळुन
तुझ्या डोळ्यांतील गही-या डोहांत
कधी पाहीलेयस का तु डुंबुन
कशी जादु करतात ते नकळत
ते पाहीलेस का तु कधी अनुभवुन
तुझ्या ओठांची तुलना करताच
गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात
बोटे मोडुन कडाकडा डोक्यावर
चटकन गालावर काळा तिळ लावतात