आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं.....
उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं.....
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं.....
कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
नातं तुटलं तरी प्रेम हे रहातच
कितीही प्रयत्न केला
तरी डोळ्यातून ते वहातच!
आपसूक डोळे भरून येतात
नाही रडायच ठरवलं तरी
अन् रडायला सुद्धा डोळे आता
शोधत नाहीत कारणं नवी!
दिशाहीन वाटतो आपलाच जीवन प्रवास
नकोसा वाटतो नव्याने पुन्हा कुणाचा सहवास
नात्यासंगे तुटतो तो असे विश्वास
करू लागतो नकळत आपण आपलाच दुःस्वास!
काय म्हणूनी आज जाहले
आज इथे हे असे ठेपले
मन माझे वेडे तुझ्यात गुंतले
तुझे मात्र पुरतेच विझले !
आता मात्र पुरे झालं
खूप सोसलं खूप भोगलं
जगण्याची इच्छा नव्याने शोधत
मी माझं मलाच शोधलं!
आता मात्र पुरे झालं
खूप सोसलं खूप भोगलं
जगण्याची इच्छा नव्याने शोधत
मी माझं मलाच शोधलं!
बरं झालं, जे झालं ते झालं
वेळच्या वेळीच तुटलं नी संपलं
खोटं खोटं नाटक करण्यात
पुरेसं आयुष्य तू तुझं वेचल!
तरीही कधी कधी येतोस तू
हळूच माझ्या मनातं
अन् पुन्हा नव्याने सुरू होतो
प्रवास माझ्या स्वप्नात!
आता मात्र ते स्वप्न
स्वप्नच रहावं हीच आशा
कारण स्वप्न तुटताच हाती लागते
ती असते फक्त निराशा ....
ती आली आयुष्यात मी बेभान झालो,
कळले नाही कधी मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या प्रेमात मी हरवून गेलो,
कळले नाही कसा शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात मी देहभान विसरलो,
तिच्या प्रितीन पुरता मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना ती जन्म देते,
माझ्या हातून सारं ती लिहून घेते.,
माझी कविता म्हणजे तिचा न माझा संवाद असतो,
मी फक्त तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी हे माझं प्रेम आहे,
चार दोन कविता करून प्रेम थोडच थांबणार आहे,
माझं प्रेम जगावेगळं ते कधीच मिटणार नाही,
हे जग सोडेपर्यंत
हि भावना मनातून जाणार नाही.....
जगायचं आहे मला पण जगू शकत नाही
एकटं रहायचं आहे मला पण एकटं राहू शकत नाही
जपायचं आहे तुला पण आता जपू शकत नाही
आयुष्यभर तुझ्यासोबत जगायचं आहे पण आता तेवढी माझी लायकी नाही
जीवन साथी बनवायचं आहे तुला पण आता तेवढं माझ नशीब राहील नाही
आठवणी अशा काही देवून गेलास तू
ज्यांना मी कधी विसरूच शकत नाही
ज्यांना मी कधी विसरूच शकत नाही
जाता जाता ती बोलून गेली
मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं
तुझं सुःख आहे.
.
तिला कधी कळलचं नाही की,
तिच्या शिवाय आयुष्य हेचं
सगळ्यात मोठं दू :ख आहे....!!!!!
मी तर रोजचं रडलोय,
तुझी आठवण काढुन,
एकदा तुला ही माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....
मी तर रोजचं,
वाट पाहतो तुझी,
एकदा मला ही तुला,
माझी वाट पाहताना पहायचंय.....
मी रडताना माझ्यावर,
हसतेस तु,
एकदा तसं मला ही,
तुझ्यावर हसायचंय.....
रोज एकटा रडतो मी,
एकदा मला ही तुझ्या सोबत,
मन भरुन रडायचंय.....
तु माझी होणार नाही,
हे माहीत आहे मला,
तरीही या डोळ्यांनी तुला,
दुस-याची होताना पहायचंय.....
येणा-या प्रत्येक जन्मी,
मला तुझ्याचं,
आठवणीत जगायचंय.....
आणि पुढच्या प्रत्येक जन्मी,
तु माझी होशील,
या खोट्या आशेवरचं मरायचंय.....
एकदा खरचं
मला तुला माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....
हसण्याची इच्छा नसली
तरी हसावं लागतं
कसं आहे विचारलं
तर मजेत आहे म्हणावं लागतं
जीवन हे एक रंगमंच आहे
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं.
जर एखादी व्यक्ती
आपल्या बोली
की...
तु मर नाहीतर काही
पण कर मला काही
फरक पडत नाही. ..
.
तेव्हा समजून जा की
त्या व्यक्तीला आपण
नकोय...
तिला आपली गरज नाही. ..
.
किंवा त्या व्यक्तीला आपला
कंटाळा आला आहे. .
एक व्यक्ती कंटाळून
जेव्हा नात
तोडण्याची
भाषा करू लागते
.
अशा वेळी
दुसर्या व्यक्तीच्या
समोर असत ते फक्त
प्रश्न चिन्ह माझ काय चुकल ?
प्रेमाचाच लिलाव होत आहे...
नजरांचे भाव असे बोलू लागतात
नयने ही हजार स्वप्ने रंगवू लागतात...
ओठांवरील शब्द डोळ्यातुनी व्यक्त होतात
नयनातुनीच प्रेमाचे इशारे सुरु होतात...
खेळ हा शब्दांचा असा जणू रंगतो
बेरंगी जीवनात रंगांची उधळण करतो...
स्वप्ने प्रेमाची अशी सजू लागतात
प्रेमात वास्तविकता विसरण्यास भाग पाडतात...
खेळ शब्दांचा कधी न समजण्यास येतो
अग्निपरीक्षा प्रेमाची देण्यास सदा प्रेमी भुलतो...
क्षणात विरहाचे असे वादळ उठतेस
साता जन्माचे वचन काही महिन्यात तुटते...
प्रेमाच्या या जगात प्रेमाचाच लिलाव होतो
अशा या प्रेमाचा रोज एक तरी बळी दिला जातो...
स्वार्थी या दुनियेतुनी प्रेम आज हरवत आहे
प्रेमाच्या या बाजारात प्रेमाचाच खेळ मांडत आहे...