पाहीलस....आता या डोळ्यातून
आसवही ओघळत नाही
तुला पुन्हा पुन्हा आठवून
जखमांना मी चिघळत नाही
परीस्थितीने लढायला शिकवल
म्हणूनच मी लढतोय
उद्याचे सुख बघण्यासाठी
दुःखाच्या सावलीत घडतोय
आठवणी तर नेहमी पाझरतात
कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
अस वाटत कोणीतरी साद घालतय
आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून
जगाच दुःख तू पाहू शकते
माझ दुःख का नाही दिसत
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये
माझ नाव नाही बसत
का विसराव मी तीला
का विसराव तीने मला
जीने माझ्या कवि मनाला
आपल्या प्रेमातून जन्म दिला
काय म्हणाव या डोळ्यांना
काजळ बनून गोठून जाव यात
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना
हळूच मिटून घ्याव हॄदयात
मायेच्या ओलाव्यात हरवलस तु स्वतःला
कवितांच्या मैफ़िलीत मीरवलस तु स्वतःला
सर्वांना जवळ करण्याच्या नादात
मला एकट्याला दुरावलस तु आता
तीच्या आठवणींपासून दूर जाण
तुला कधी जमणार नाही रे
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी
सुगंध त्याचा सुकनार नाही र
"ऊजेडावर जीतक प्रेम केल
तितकच मी अंधारावरही केल
पहाटेच्या धुक्यामध्ये
सार विरघळूनच गेल...!"
जगातील सगळ्यात
महाग पानी कुठले ??
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
आश्रु..
कारण
त्यात १% पानी असते
आणि
९९% भावना असतात.