"का कुणी दवाला मोत्यांचे नाव दिले
एवढ्या छान गुलाबाला काट्यांचे घाव दिले
कश्या सुचल्या असतील कुणाला ह्या उपमा
हृदयाला झालेल्या पाहील्यात
का तुम्ही जखमा"
तुझ्या शब्दांची वाट पाहण्यातच
कितीतरी कविता लिहून झाल्यात
कागदावर उतरलेल्या सार्या कविता
तुझ्या आठवणींना पिऊन आल्यात
अक्षरातल तुझ जीवन
चारोळीतून माझ्या समोर आलय
तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत
जीवन अक्षरांना मी समर्पीत केलय
भोग आहेत नशीबाचे
भोगावे तर लागतीलच
आज पेरलेली रोपटी
कालांतराने उगवतीलच
मन स्थिर व्हायच असेल तर
विचारांच चक्र थांबवाव लागत
दुःख पिऊन घ्यायच असेल तर
अश्रुंच थेंब व्हाव लागत
वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल
माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल
अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे
ते सहज कस कोणाला वाचता येईल
"एकट्या पडलेल्या मनाला
कोणीतरी आधार देणार हव
शब्दांना व्यवस्थित मांडून
कवितेतून आकार घेणार हव"
तुला आठवल की तो किनारा आठवतो
पायखालची ती ओली वाळूही आठवते
या आठवणींच एक छोटस गाव मी वसवते
हे सार डोळ्यात घेऊन
पापणी डोळ्यांना मिटवत
"माझे श्वास मिटण्याआधी
एकदा येऊन भेटून जा
गळून पडलेल शरीर माझ
एकदा अंगाशी लपेटून जा....
माझ्यातल्या तुझ्या आठवणींना
एकदा येऊन समेटून जा
श्वास माझे मिटण्याआधी
फ़क्त एकदा येऊन भेटून जा"
"तुझी एखादी कविता दे ना
माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला
सुरुवात केली आहे मी आता
माळ आठवणींची ओवायला"