दूर जाणाऱ्या तुझ्या
डोळ्यांत मी माझ्या
पासूनच दुरावत होतो..
तुझ्यातून विलग होऊन
पुन्हा तुझ्यातच हरवत होतो..
तुझ्या शिवाय जगण तर
सोडच मरण सुद्धा कठीण
आहे..
उरलेल्या प्रत्येक श्वासात
आता अखंड जळण आहे..
वाट पाहणं त्रासदायक नसतं..
.
.
.
.
त्रासदायक असते ही
जाणीव की आपण ज्या
व्यक्तीची वाट पाहतोय..
.
.
.
.
.
ती व्यक्ती आपल्या
आयुष्यात परत येणार
नाहीये.
तीच्यावर केलेल्या प्रेमाच
आठवण हे व्याज आहे
मी दिलेल्या चुंबनाची
तीच्या ओठांवर लाज आह
हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा
माझ्या मिठीतला तुझा सुगंध
अजुनही मला जाणवतो
ती रात्र मीलनाची आठवून
तारा हॄदयातला पाणवतो
"किती छान जाणीव असते
आपण कोणाचे तरी असणे
या पेक्षा भयंकर काहीच नाही
जगात आपलच कोणी नसणे"
माझ्यासोबत जगण्याचा
सोड तु वेडा अट्टहास
मंगळसुत्र तर दूरची गोष्ट
गळ्यात पडेल काट्यांचा फ़ास
बंधनांच कुंपण ओलांडून तु ये
हव तर घरच्यांशी भांडून तु ये
खूप जगलीस दुसर्यांच्या मर्जीप्रमाणे
गुलामीच आयुष्य कोंडून तु ये
स्वप्नांची राखरांगोळी करायच
माझ मीच ठरवल आहे
तुझ्या आठवणींनाही जागा नसेल
अस नव स्वप्न मी बनवल आह
प्रेमात किती बुडाले किती तरंगले
याची काही गिणतीच नाही
प्रेमभंगाच्या दुःखासारखी
वाईट गोष्ट कोणतीच नाही