नाही जमणार आता,
मला ते प्रेम वेगेरे,....
नाही जमणार आता,
मला ते आवडणे वेगेरे.....
समज आता नाही उरले,
तसे काही नाते,
समज आता नाही राहिले,
तसे काही बंध.....
पुन्हा पुन्हा नाहीसहन,
व्हायचे ते सोडून जाने,
पुन्हा पुन्हा नाहीआता,
जमायचे ते तुला स्वीकारणे.....
नाही तुला माज्या,
प्रेमाची कदर,
नाही तुला माज्या,
यातनांची खबर.....
विसरण्याचा प्रयत्न करतो मी,
मनाला समजावतो मी,
रडता रडता मन हि म्हणते,
इट्स ओके.....
जाता जाता तू परत कायेते,
इट्स नोट ओके,
इट्स ओके कधीच नव्हते,
तू गेल्यानंतरही... ..
इट्स ओके कधीच होणार नाही,
तू आल्यानंतरही....
आता संपलंय ते भास होणे,
तू नसल्या ठीकाणी तुला पाहणे,
तू समोर आल्यावर,
स्वतःलाच विसरुन जाणे,
आता संपलंय ते सारं...
आता संपलंय ते तुझे शब्द आठवणे,
तू बोलत असताना माझे गप्प होणे,
आणि
तुल एकटक बघत रहाणे,
आता संपलंय ते सारं...
आता संपलंय तुझ्यासाठी घरी थापा मारणे,
Extra-Class च्या नावाखाली तुला भेटणे,
तासन् तास बोलत रहाणे,
आणि
फोन चे बिल वाढवणे,
आता संपलंय ते सारं...
आता संपलीयेत ती भांडणे,
शुल्लक गोष्टीवरुन रुसणे,
थोडा वेळ अबोला धरणे,
आणि
नंतर मीच Sorry Sorry Sorry म्हणणे,
आता संपलंय ते सारं...
आता संपलंय एकटं असता तुला आठवणे,
तुला आठवून माझे हळवे होणे,
रात्रभर एकच गाणे ऐकणे,
आणि
कधी हळुच अलगद डोळ्यातून पाणी ओघळणे,
आता संपलंय ते सारं...
आता संपलंय ते तुझ्यासाठी श्वास घेणे,
तुझ्यासाठी जगणे,
आणि
तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवर कविता करणे,
आता संपलंय ते सारं.......
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत
असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत
असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत
असत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न
बघत
असत कोणीतरी..
भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
.
प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते विसरण्याची...
.
खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
.
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना....
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही
याची जाणीव होणे...
एकक्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी...
एक क्षण
लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी....
पण फक्त एक नजर लागते कुणावर
तरी प्रेमकरण्यासाठी...
आणि आयुष्य लागते
त्याला विसरण्यासाठी...!!
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो ।
सागराने ऐन वेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो ।
मागतो जो तो फुले ताजी
तवानी कोण निर्माल्यास येथे
भाव देतो ?
खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे ।
ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो
हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी ।
आज दुःखाला जरासा वाव देतो..
"एक अश्रू.."
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..तो अश्रू..हलकेच
माझ्या पापण्यांना भिजवतो..पण वाहत
मात्र नाही,
एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,तुझ्यासोबत
चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात.
जीवन मिळते एकाचं वेळी......
मरणं येतं एकाचं वेळी...
प्रेम होतं एकाचं वेळी...
ह्रदय तुटतं एकाचं वेळी...
सर्व काही होतं एकाचं वेळी...
तर तिची आठवण...
का..?. येते वेळो वेळी..
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते ,
तर अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती .