वेड मला लावुन तु शहाणी झालीस...
प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?
नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?
चुक झाली माझी
चुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम केले...
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?
नको ढाळुस अश्रु आत्ता
नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...
बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...
आज रहाशील गप्पं
आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
कधी तू समोर दिसला की,
कुशीत येऊन तुझ्या रडावेसे वाटते..
जीव जडला आहे तुझ्यावर,
ओरडून ओरडून सांगावेसे वाटते..
तू कोण,ओळखत नाही मी तुला,
तुझ्या या शब्दाना आठवून..
मग उचलेले पाऊल,
पुन्हा मागे घ्यावेसे वाटते...
साला तुज्यावर ना
खुपच विश्वास ठेवला ,
तु पण त्या आरशा
सारखीच निघालीस,,
.
.
.
.
जो समोर आला
त्याचीच होऊन
बसलीस.....!
जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
कश्या करू मी कविता आता... ?
कसे रचू मी शब्द... ?
लिहाव तर खूप काही वाटत होत
तेंव्हा,
अस्तित्व होत तुझ
माझ्या जीवनात जेंव्हा,
तू म्हणायचीस तेंव्हा
माझ्यावर पण एखादी कविता कर ना,
आता तर माझे शब्दच माझ्यावर रुसले,
आठवणीत तुझ्या चार शब्द कागदावर रचले,
पुढे लिहाव म्हटलं,
पण क्षणात सारे बोल कंठात येऊन दाटले,
डोळ्यांतून ओघळलेले अश्रू
टप टपा कागदावर टपकले,
अश्रूंच्या धारेमध्ये लिहलेले
शब्दही वाहून गेले,
कारण...?
नियतीने माझे प्रेमच
माझ्या पासून हरवून नेले...
संपले ते दिवस
एकमेकांना चिडवायचे
एकमेकांशी भांडायचे
एकमेकांना सुखी करायचे
एकमेकांचे दु:ख हालके करायचे
संपले ते दिवस....
राहील्या त्या फक्त आठवणी
काही सुखद, काही दुखद..
माणसे प्रेम करण्यासाठी असतात.
आणि पैसा वापरण्यासाठी असतो.
हल्ली गडबड अशी झाली आहे की,
पैशावर प्रेम केले जाते.
आणि माणसे वापरली जातात.
नका लावू कुणालाच
जीव,
दुनिया निघाली बडी
निर्जीव,
भावनेशी खेळुन लोक ह्रदय
तोडतात,
बर्बाद करुन शेवटी
SORRY बोलतात......
वेदना फक्त हृदयाचा आधार घेवून सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती....!!
शब्दांचा आधार घेवून जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी #अश्रूंची गरज भासलीच नसती........!!!
जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा