पाकळ्याच गळण म्हणजे
फुलाच मरण असत,
मरताणाही सुंगध देण
यातच आयुष्य सार असत,
अस आयुष्य जगण
म्हणजे खरच सोन असत,
पण
या आयुष्यात तुमच्या
सारखे स्नेही मिळाले.
तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत
रोज आठवण न
यावी असे होतच नाही..
रोज भेट घ्यावी यालाही
काहीच हरकत नाही..
मी तुला विसरणार नाही
याला "विश्वास" म्हणतात
आणि..
तुला याची खात्री आहे यालाच
"मैत्री"
म्हणतात..
आयुष्यं हे बदलतं असतं !
शाळे पासून कॉलेज पर्यंत,
चाळी पासून फ्लँट पर्यंत,
पुस्तका पासून फाईल पर्यंत,
जीन्स पासून फॉर्मल पर्यंत,
पॉकेटमनी पासून पगारापर्यंत,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत,
लहाण पणा पासुन
वृद्धत्वा पर्यंत,
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात...
प्रेमळं,
जिवलगं,
सच्चे आणि जिवास जिव
देणारे..माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !!
बंधना पलीकडे
एक नाते असावे,
शब्दांचे बंधन
त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा
आधार असावा,
दु:खाला तिथे
थारा नसावा,
असा गोडवा एक
आपल्या मैत्रीत असावा.
नात तुझ माझ
मैत्रीच कि प्रेमाच…
नात तुझ माझ
सात जन्माच…
नात तुझ माझ
आपल्या छोटयाश्या
विश्वातल…
नात तुझ माझ
एक मेकांच्या साथिच…
नात तुझ माझ
आपल्या स्वप्नातल…
नात तुझ माझ
माझ्या कवितेतल…
"मैत्रीच कि प्रेमाच
नात तुझ माझ''
मैत्री म्हणजे पान नसते
....सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते
....कोमेजायला,
...
मैत्री म्हणजे फळ नसते
....पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते
....तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना"आधार"द्यायला..
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन्
वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि
सावली कधी साथ सोडत नाही......
मैत्री म्हणजे शब्दां शिवाय
एक मेकांचं मन जाणून घेणं,
चुकलं तर ओरडणं,
कौतुकाची थाप देणं,
एक मेकांचा आधार बनणं,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास,
मैत्री म्हणजे आयुष्याचा
प्रवास सुसह्य करणारी
हिरवी गार पाऊल वाट..
मेल्यावर स्वर्ग
नको आम्हास,
जिवंत पणी
यश पाहिजे,
अंतक्रियेला गर्दी
नको माणसांची,
जिवंतपणी मित्रांची
साथ पाहिजे....!
आपल्याला २ गोष्टी कळतात..
१: दोस्ती केली
तरती मरेपर्यंत..
२: दुष्मनी केली तर
त्याचा विषय संपवे पर्यंत...
आयुष्यात प्रत्येकाने
अनुभवलेली एक गोष्ट
म्हणजे कॉंप्रमाइज़... !
त्यावरच काही ओळी...
आजवर पर्यंत फक्त
कॉंप्रमाइज़ करत आलोय
शाळेत असताना सुट्टी
संपल्याच कॉंप्रमाइज़,
कॉलेज ला गेल्यावर ग्रूप
तूटल्याच कॉंप्रमाइज़,
शिक्षण संपल्यावर
जॉब साठी कॉंप्रमाइज़,
आणि
जॉब वर तर आपल्या
वेळेच कॉंप्रमाइज़,
मोठा झल्यावर आवडी
निवडी च कॉंप्रमाइज़,
सेविंग करायची म्हणून
शॉपिंग च कॉंप्रमाइज़,
कधी घरच्यान साठी
कॉंप्रमाइज़ तर कधी
तीच्या साठी कॉंप्रमाइज़,
आयुष्यात खूप
कॉंप्रमाइज़ केल..
फक्त एकाच ठिकाणी
माना सारख जगायला
मिळाल, हसायला मिळाल..
ते म्हणजे आपले मित्र
☆सोडुन जाणारे..
कायमचे सोडुन गेले..☆
☆ते आठवंणींचे बीज,
माझ्या मनी पेरून गेले..☆
☆आता त्या ८वणींचे,
एक भलेमोठे वृक्ष बनले..☆
♡→हे यारा←♡
☆त्या ८वणींच्या वृक्षानेच
मनात आपुलकीला ६०वुन
ठेवले..☆