आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ…
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये
वळून बघू नकोस
कारण
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…
१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते..
खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना
सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटती
एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे...
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे...
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय ...
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात ,
राहता आल पाहिजेल ..!
चांगले मिञ या जगात
सहजा-सहजी मिळत नाहित…
जवळ असताना माञ
एक-मेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि
पण एक माञ वळत नाहि…
काय असते हि मैञी?
ते मिञांपासुन दुर
गेल्या शिवाय कळत नाहि..
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते...
मैत्री म्हणजे त्याग आहे,
मैत्री म्हणजे विश्वास आहे,
हवा फक्त नावा पुरती तर!
मैत्री खरा श्वास आहे,
मैत्रीच्या या नात्या बद्दल
लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे,
मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो,
मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो...
"मैत्री"
मैत्री असावी पाण्या सारखी
निर्मळ, नितळ, स्वछ जशी।।
मैत्री असावी समुद्रा सारखी
उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी॥
मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी
थकलेल्या जीवाला सावली देणारी॥
मैत्री असावी स्वच्छंदी
फुल पाखरा सारखी॥
मैत्री असावी नात्यां पलीकडची
जात, धर्म,वय, भाषा न झुगारणारी
मैत्री असावी अशी की शब्दांत न
मांडता येणारी पण सुखं दु:खात
नि:शब्द साथ देणारी अन् चिरंतन
टिकणारी...
जे निस्वार्थ
पणे, केले जातं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
जे रक्ताचं नसलं तरी,
नसानसात भिनतं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
जे सर्व नात्यापासून,
आहे श्रेष्ट, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं...
जे परख्यानाही,
आपलसं करतं, तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं..
कधीतरी रडत असतो,
ते कोणाला दिसत नाही..
कधी तरी काळजीत असतो,
ते कोणाला दिसत नाही..
कधीतरी आनंदी असतो,
तेही कोणाला दिसत नाही...
पण कधी तरी GF
बरोबर फिरायला जा,
साले सगळे ओळखीचे
तिथेचं मरायला येतील..