"नाते-गोते"
भरपुर असायला पाहीजे...
पण
नात्याला
"गोत्यात आणणारे"...
एकही नाते असायला नको.
ज्यांनी आज पैसे कमावले ते तर
उद्या खर्चच होणार !!!
आम्ही तर माणसे कमावली आहे ते
तर उद्या नक्की कामी
येणार............
मैत्रीसाठी पुढे केलेला हात
कोणी मागे घेत नसतं .......... ...
पण जीवनभर विश्वासने
साथ देणारा हात आपणच
आपलं शोधायचा असतो......
सावलीसाठी कोणी स्वताहून
आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात
सावलीसाठी एक झाड
आपणच आपलं शोधायचं असत
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो,
फोन केला तरीही शिव्या घालतो,
समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल
तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो,
कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल
आपल्याला करतो,
कुठे आहेस म्हणुन विचारतो,
बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो,
परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़र ला घाल चुलीत म्हणुन
सप्प्लिमेंट हातात देतो,
आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट
प्रश्न करतो,
सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच
तर जिवलग मित्र असतो.
चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित
जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..
कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि
काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि
चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही 'ऊसा'
सारखी असते,
तुम्ही त्याला तोडा,
घासा,
पिरगळा,
ठोका किंवा
ठेचुन बारिक बारिक करा
तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.......
जर तुम्हाला तुमची
श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजू नका !
कधी चुकून
डोळयांत दोन अश्रू आले तर
ते
पुसायला किती जण येतात ते
मोजा. ..
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील
श्वासातला श्वास असते
मैञी....ओठातला घास असते
मैञी....काळजाला काळजाची आस असते
मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते
ती मैञी..
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव
देणारे..माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !.
"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक " दिपमाळ"
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की "माणुसकीचं" एक
सुंदर नातं तयार होतं.