झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझे आहे
रंग माझे असले तरी
चित्र मात्र तुझे आहे
ह्रदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे
नजर माझी असली तरी
भास मात्र तुझा आहे
शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे
वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझे आहे
आयुष्य माझे असले तरी
त्यावर हक्क फक्त तुझा आहे
पूर्ण नसलो जरी मी
अपुर्ण मात्र तुझ्या मुळेच आहे
डोळे पुसायला कुणीतरी असेल
तर रुसायला बरं वाटतं ………
ऐकणारे कुणीतरी असेल तर
मनातल बोलायला बरे वाटते …..
कौतुक करणारे कुणीतरी असेल तर
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं …….
आशेला लावणार कुणीतरी असेल तर
वाट बघायला बरं वाटतं ………..
आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तर
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं ………..!
तु ही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं।।।
स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त माझंच स्वप्न पडावं।।।
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने छळावं।।।
तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप खूप रडावं।।।
कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं।।।
कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं
चित्र पूर्ण होऊनही ...तुला ते अर्धवटच वाटावं।।।
मरणही असं..... तुज्या मिठीत यावं
की मरणानंतर ही ते मरण मला याद रहावं
सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं भरावं
की दु:खाला पण माझ्या आयुष्यात येताना कोडं पडावं
प्रेम हृदयातील एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभर लपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
फक्त एक भावना.
नातं तुटलं तरी प्रेम हे रहातच
कितीही प्रयत्न केला
तरी डोळ्यातून ते वहातच!
आपसूक डोळे भरून येतात
नाही रडायच ठरवलं तरी
अन् रडायला सुद्धा डोळे आता
शोधत नाहीत कारणं नवी!
दिशाहीन वाटतो आपलाच जीवन प्रवास
नकोसा वाटतो नव्याने पुन्हा कुणाचा सहवास
नात्यासंगे तुटतो तो असे विश्वास
करू लागतो नकळत आपण आपलाच दुःस्वास!
काय म्हणूनी आज जाहले
आज इथे हे असे ठेपले
मन माझे वेडे तुझ्यात गुंतले
तुझे मात्र पुरतेच विझले !
आता मात्र पुरे झालं
खूप सोसलं खूप भोगलं
जगण्याची इच्छा नव्याने शोधत
मी माझं मलाच शोधलं!
आता मात्र पुरे झालं
खूप सोसलं खूप भोगलं
जगण्याची इच्छा नव्याने शोधत
मी माझं मलाच शोधलं!
बरं झालं, जे झालं ते झालं
वेळच्या वेळीच तुटलं नी संपलं
खोटं खोटं नाटक करण्यात
पुरेसं आयुष्य तू तुझं वेचल!
तरीही कधी कधी येतोस तू
हळूच माझ्या मनातं
अन् पुन्हा नव्याने सुरू होतो
प्रवास माझ्या स्वप्नात!
आता मात्र ते स्वप्न
स्वप्नच रहावं हीच आशा
कारण स्वप्न तुटताच हाती लागते
ती असते फक्त निराशा ....
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...♡♡
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...♡♡
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡
तू माझा आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझा म्हणायला खूप आवडते...♡♡
मनालाही समजावलय तू माझा नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते...♡♡
कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ
तो शिकवता येत नाही यालाच
प्रेम म्हणतात असं काही शास्त्र
नाही..
प्रेमात पडल्यावर ही कां
प्रेम करतो सांगता येत नाही..
कधी फक्त एका नजरेत
प्रेम कळून जातं कधी कुणाच्या
सहवासात प्रेम भेटून जातं..
प्रेम आयुष्यात आल्यावर
जगणं मात्र बदलून जातं..
सारं काही तेच असून ही
वेगळ्या विश्वात घेऊन जातं..
सर्वस्व ओवाळून टाकावं
इतकं कुणी आवडून जातं
दोन आत्म्यांच मिलन प्रेम
भेटता होऊन जातं..
ज्याला भेटतो प्रेमाचा
अनुभव त्यालाच प्रेम कळून
जातं..
बाकीच्यांच्या लेखी प्रेम
म्हणजे वेड्यांच जग होऊन
जात..
Busy Busy काय करता
वेळ काढा थोडा
आयुष्यभर चालूच असतो
संसाराचा गाडा
खूप काम, रजा नाही
मिटिंग, टार्गेट,फाईल
अरे वेड्या यातच तुझं
आयुष्य संपून जाईल
नम्रपणे म्हण साहेबांना
दोन दिस रजेवर जातो
फॉरेन टूर राहिला निदान
जवळ फिरून येतो
आज पर्यंत ऑफिससाठी
किती किती राबलास
खरं सांग कधी तरी तू
मनाप्रमाणे जगलास ?
मस्त पैकी पाऊस झालाय
धबधबे झालेत सुरू
हिरव्यागार जंगला मध्ये
दोस्ता सोबत फिरू
बायकोलाही म्हण थोडं
चल येऊ फिरून
डार्लिंग डार्लिंग खेळू आपण
पुन्हा होऊ तरुण
पंजाबी घाल, प्लाझो घाल
लाऊ द्या लाल लिपस्टिक
बायकोला शब्द द्यावा
करणार नाही किटकीट
पोळ्या झाल्या की भाकरी
अन भाकरी झाली की भाजी
स्वयंपाक करता करताच
बायको होईल आजी
गुडघे लागतील दुखायला
तडकून जातील वाट्या
दोघांच्याही हातात येतील
म्हातारपणाच्या काठ्या
जोरजोरात बोलावं लागेल
होशील ठार बहिरा
मसणात गवऱ्या गेल्यावर
आणतो का तिला गजरा ?
तोंडात कवळी बसवल्यावर
कणीस खाता येईल का ?
चालतांना दम लागल्यावर
डोंगर चढता येईल का ?
अरे बाबा जागा हो
टाक दोन दिवस रजा
हसीम...
का कुणास ठाऊक आठवण येत होती क्षणोक्षणी ।।
व्याकुळतेने डोळ्यातून तरंगत होते पाणी ।।
त्या मधुर स्वरांची व हास्याची होतीच आणिबाणी ।।।
दुर असूनही सुगंध देणारी सतत आठवत होती ती रातराणी ।।
काय सांगावे हे नाते स्नेह बंधनाचे।।।
विरह देखील देतो सुगंध चंदनाचे।।।
तु पैल तिरावर मि ऐल तिरावर।।। या सुगंधाचे वेड घेतले मि माझ्या उरावर।।। तुझ्याच मैत्रीने बसला मैत्रीवर विश्वास ।।।
मि पण या कसोटीवर उतरणार जोपर्यंत आहे शेवटचा श्वास।।।
तुझ्याच त्या स्मित हास्याने मन होते उल्हास ।।।तो स्वर तोच खरा ध्यास।।।तुझे गोड शब्द ऐकण्यासाठी मन झाले होते व्याकूळ ।।।असे वाटत होते राधाकृष्ण विना सुन्न झाले होते गोकुळ।।।
ती आली आयुष्यात मी बेभान झालो,
कळले नाही कधी मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या प्रेमात मी हरवून गेलो,
कळले नाही कसा शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात मी देहभान विसरलो,
तिच्या प्रितीन पुरता मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना ती जन्म देते,
माझ्या हातून सारं ती लिहून घेते.,
माझी कविता म्हणजे तिचा न माझा संवाद असतो,
मी फक्त तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी हे माझं प्रेम आहे,
चार दोन कविता करून प्रेम थोडच थांबणार आहे,
माझं प्रेम जगावेगळं ते कधीच मिटणार नाही,
हे जग सोडेपर्यंत
हि भावना मनातून जाणार नाही.....