क्षणोक्षणी आठवण यावी तुझी
प्रत्येक स्वप्नात भेट व्हावी तुझी...
तू दिसताच एकाएकी मन हरवावे
सहवासात तुझ्या भान हरपून जावे...
आतुर तुझी एक झलक बघण्यासाठी
प्रतिक्षेत मी तुझ्या एका नजरेसाठी...
तुझ्याविना अप्रकाशित हे तारे
तुझ्यासवे मनोरम्य जीवन सारे..
वाटे लाभो सहवास तुझा जन्मान्तरी
व्हावा तुझा जीव माझ्याच अन्तरी..
संगतीत तुझ्या फुलावी स्वप्न नवी
गंध प्रेमाचा फुलवीत तुझीच साथ हवी...
सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसताना ही...
सवय...
आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसता नाही...
सवय...
आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसताना ही..
सवय...
आहे...
रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची...
तो येणार नसताना ही...
सवय..
आहे...
मन मारून झोपण्याची...
झोप येणार नसताना ही...
सवय...
आहे...
अशा कित्येक सवयी
सोबत घेउन जगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही...
आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं.....
उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं.....
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं.....
कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
प्रेम कधी मागून मिळत नाही ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी शब्दांतून सांगावं लागतं....
रोज तुझी आठवण येते आणि रोज डोळ्यांत पाणी उभं राहत,
तू जवळ हवीस असं वाटताना खूप दूर आहेस,हे सांगून जातं....
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते आणि शब्द डोळ्यांतच उमटतात....
माझ्या नजरेचा अर्थ तुला समजावा म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली..?
का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का प्रेम म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघानाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द माञ ओठांवर येत नाहीत....
मी तुझी नेहमी आठवण काढेन
तू काढलीस नाही तरी चालेल,
होऊन होऊन काय होणार आहे
थोडसं वाईट वाटेल माझ्या मनाला एवढंच ना..?
तुला स्वप्नातही वाटणार नाही
इतके प्रेम देऊन जाईन मी,
आयुष्भर तुझी साथ देणारे
अगणित प्रेम-पुरावे कशी जाळशील तू आता..?
मी समोरून येताना दिसल्यावर
कदाचित तू रस्ताही बदलशील,
पण जरा विचारून बघ स्वतःला
मिटवू शकशील का तू हृदयातील माझी प्रतिमा..?
स्वप्नांच्या दुनियेत हरवशीलही तू
अवकाश्यात उंच झेप घेशीलही तू,
मात्र माझ्या इतके प्रेम करणारे हृदय
सांग , पुन्हा हेच हृदय शोधू शकशील का तू..?
मला पाहताच तुझं हृदय धडधडावं
कोणाची पर्वा न करता, तुझ्या डोळ्यांनी मला एकटक बघावं
मी ऐकत नसतानाही, तू बडबड करावं
असं ही कधीतरी घडावं
तुझं हृदय माझ्या प्रेमात पडावं
माझ्या एका शब्दासाठी तू हि तरसावं
स्वप्नात मी येईल या आशेने, रात्र-दिवस झोपावं
असं ही कधीतरी घडावं
मी कोणाशी बोलताना तु ही थोडं जळावं
स्वताचा हक्क गाजवून माझ्यावर प्रेम कराव....
असं ही कधीतरी घडावं
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून नातं कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
नातं म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक नातं जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!
...मैत्री...
स्नेहाचं बंधन
आपूलकीचं कोंदण
सहवासची आस
जीवनाचा श्वास ...हिच तर मैत्री खास...!!
रमणीय नातं
जीवनगाणे गातं
आयुष्याचं चित्र
रंगवतात मित्र...हेच तर जीवनाचं सूत्र...!!
सुखदु:खाची झळ
आयुष्यासाठी बळ
हक्काची जाण
जिथे दोघांणा मान...हिच तर मैत्री छान...!!
नको तो रुसवा
नको तो दुरावा
जमू दे गप्पांचा थाट
असुदे विचारांचा घात...हिच तर मैत्रीची वाट...!!
पूर्वीचा काळ बाबा,
खरंच होता चांगला,
साधे घरं साधी माणसं,
कुठे होता बंगला ?
घरं जरी साधेच पण,
माणसं होती मायाळू,
साधी राहणी चटणी भाकरी,
देवभोळी अन श्रद्धाळू.
सख्खे काय चुलत काय,
सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो,
आपुलकीने भेटायचे.
पाहुणा दारात दिसला की,
खूपच आनंद व्हायचा हो,
हसून खेळून गप्पा मारून,
शीण निघून जायचा हो.
श्रीमंती जरी नसली तरी,
एकट कधी वाटलं नाही,
खिसे फाटके असले तरीही,
कोणतंच काम रुकलं नाही.
उसनं पासनं करायचे पण,
पोटभर खाऊ घालायचे,
पैसे आडके नव्हते तरीही,
मन मोकळं बोलायचे.
कणकेच्या उपम्या सोबत,
गुळाचा शिरा हटायचा,
पत्रावळ जरी असली तरी,
"बायको सूंदर मैत्रीण असते"
पारिजातकाचा सुवास बायको असते,
निरपेक्ष प्रेमाचा सागर बायको असते,
नवऱ्याची प्रेरणा बायको असते,
जीवनाची अर्धनागिणी बायको असते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासूसासऱ्यास आई वडील मानते,
नवऱ्यात परमेश्वर पहाते,
सारे आयुष्य सासरसाठी वाहते,
संसारात स्वतःलाही विसरते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
आल्या जरी असंख्य काटेरी वाटा,
तरी ती धीराने सामोरी जाते,
नवय्राच्या सुख दुःखात साथ देते,
घराची ती तुळस होते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
कधी हसते, कधी रुसते,
कधी उगाच रागानी पहाते,
कधी आसवांच्या सागरात,
नवऱ्यासोबत भिजते,
कधी सुखाचे चांदणं टिपते,
खरंच बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासरचे गुण जगभर गाते,
बायकोच सांभाळते सर्व नाते,
घरात स्वर्ग तिच करते,
मनातील दुरावे तिच संपवते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
माहेराच्या आठवणीत क्षणभर डोळे ओलावते,
मनातील दुःख तिचे कोणी का जाणते?,
संसारास तीच्या अमूल्य मानते,
प्रत्येक जन्म ह्य...