Marathi Kavita

akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

थोडीशी काळजी अन थोडंसं प्रेम,
तुझा एकच कटाक्ष पण अचूक नेम
तशी तुझी प्रत्येक गोष्ट साधी,
पण तुझ्या साधेपणाचीही मला व्याधी
आपण कोण? आपलं नातं काय?
नातं नसलं की प्रेम जातं काय?
तसा प्रेमाला दिवस नसतो.
तरी आज सांगावंसं वाटतंय
तुझ्या असण्यातच माझं असणं लपलंय.
सांभाळ मला.

I Like SMS - Like: 67 - SMS Length: 699
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

तुझा चेहरा मी
हृदयात ठेवून घेतलाय
माझ्या नसानसात
तो साठवून घेतलाय
उगीच नाही रस्त्यावर
मी एकटा हसत
चालता चालता तुलाच
मी असतो बघत
लोकांना उगीच वाटत
माझे ओठ कसे हलतात
मी एकटा असूनही
ते कुणाशी बोलतात
फक्त मला माहित असत
तू आहेस माझ्या सोबत
कुणालाही कशी कळेल
हि प्रेमाची रंगत ....

I Like SMS - Like: 61 - SMS Length: 729
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

तू सोडून गेल्यावर...
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन
टाक...
माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून
टाक..
माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...
मी गेल्यानंतर...
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...
माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून
टाक..
मी मेल्यावर...
कुणी विचारलं..
कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन
टाक..
जिवलग मैत्रिण म्हणुन..
कुणी तुला विचारल..
आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक...

I Like SMS - Like: 64 - SMS Length: 1260
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

सहवासाची संगत तू
सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,

रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू .
कधी अचानक रुसतेस
मनापासुन हसतेस तू,

साद घालते मनास
ऐसे जीवनगाणे तू,
खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,

लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,
निखळ मनाचे तुझे वागणे
मला प्रेमाने साद घालणे,

राग लोभ जरी आले गेले
उरले केवळ जीव लावणे,
गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,

शब्दांमद्ये आकार तू
प्रेमामध्ये साकार तू,
प्रत्येक दिवशी आठवतात
या प्रेमाची खुप कारणं,

सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं.

I Like SMS - Like: 52 - SMS Length: 1371
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

ती फ़क्त आईच!!!
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
.
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते...
ती आई
.
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..
ती आई
.
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई
.
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
.
परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई
.
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
.
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच..... ♥♥

I Like SMS - Like: 61 - SMS Length: 966
Added 3 years ago

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?
माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?
ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?
हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?
कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना

I Like SMS - Like: 78 - SMS Length: 1944
Added 4 years ago

मी हसत होतो,
ती हसवत होती,
मी फसत होतो,
ती फसवत होती.....
मी चिडत होतो,
ती चिडवत होती,
मी रडत होतो,
ती रडवत होती.....
मी बोलत होतो,
ती विचारत होती,
मी ऐकत होतो,
ती सांगत होती.....
मी वेडा होतो,
ती शाहणी होती,
मी अश्रुं होतो,
ती पानी होती.....
मी कोण होतो ?
ती कोण होती,
मी शेवट होतो,
ती सरण होती.....
मी शेवट होतो,
ती सुरुवात होती,
मी मरण होतो,
ती कारण होती.

I Like SMS - Like: 81 - SMS Length: 865
« Previous 1 2 3 4 5 6 Next »
Jump to Page