Marathi Kavita

akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

फक्त तुझ्यासाठी
मला तुला भेटायच
होत
मनातल सगळ
सांगायच होत
डोळे भरून
तुला पहायच होत
मनसोक्त
तुझ्यासमोर रडायच
होत
खूप काही बोलायच
होत
खूप काही ऐकायच
होत
तुझ्या डोळ्यात
स्वतःला पहायच
होत
तुझ्या तोंडून माझ
नाव ऐकायच होत
पण झाल ते ह्याहून
खूप वेगळच होत
तुझ्याशिवाय
मला जगाव लागल
तू
रडताना मला हसाव
लागल
तू
थांबवताना मला जाव
लागल
तुला पाहून
मला लपाव लागल
जे झाल ते झेलाव
लागल
ऐवढ
होऊनही तुझ्यासाठी
फक्त तुझ्यासाठी
मला जगाव
लागल ......

I Like SMS - Like: 56 - SMS Length: 1155
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं सारं कही, क्षणात दुसर्याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
अन् अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.....

I Like SMS - Like: 60 - SMS Length: 1495
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

जे साहिले तुझ्यास्तव ते दुखं फार होते
तुज समीप यावया जणू तेच दार होते
जे गायीले तुझ्यास्तव ते गीत आर्त होते
स्वर तेच मिलनाचे माझ्या समीप होते
जे बोलले तुझ्याशी ते बोल अंतरीचे
नाते तुझे नि माझे तितकेच खोल होते.

I Like SMS - Like: 54 - SMS Length: 552
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

डोळ्यांत तुझ्या पाहिलं कि ,
आरश्यात पहावसच वाटत नाही .....
हृदयात तुझ्या राहतो मी ,
आता घरी रहावसच वाटत नाही .....
तुझ्या गालावरची खळी पहिली कि ,
हसू थांबवावसच वाटत नाही .....
खूप आनंदी असलीस कि ,
तुझा आनंद ओसरवासाच वाटत नाही ....
तू जवळ असलीस कि माझ्या ,
तुझा सहवासच नसावा अस वाटत नाही ....
खूप करतेस प्रेम माझ्यावर तू ,
हे प्रेम कधी आटावसच वाटत नाही .....
तुझी आठवण येणार नाही ,
असा दिवसच यावासा वाटत नाही .....
चांदण्या रात्रीचा गोड, रम्य स्वप्न ....
दिवसाही तुटावस वाटत नाही ....

I Like SMS - Like: 53 - SMS Length: 1186
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

माहीत नाही मला
तुझं खरं प्रेम असेल का ?
पण मी मात्र तुझ्यावर
मरमर मरतो
माहित नाही मला
तुझं खरं प्रेम असेल का ?
पण मी मात्र तुझ्यासाठी
दिवस रात्र झुरतो
माहित नाही मला
तुझं खरं प्रेम असेल का ?
पण मी मात्र तुझी एक
झलक पाहण्यासाठी तडपडतो
माहीत नाही मला
तुझं खरं प्रेम असेल का ?
पण मी मात्र तुझा
आवाज ऐकण्याठी तळमळतो
माहीत नाही मला
तुझं खरं प्रेम असेल का ?
पण मी मात्र तुझ्या
हसण्याची वाट बघतो
माहीत नाही मला
तुझं खरं प्रेम असेल का ?
पण मी मात्र तुझ्यासाठी
देवाकडे आयुष्य मागतो. .......

I Like SMS - Like: 66 - SMS Length: 1246
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

कसली होळी मी आता खेळु.....
आणी
कसला रंग मी आता ऊधळु.....
तुझी साथ होती तेव्हा म्हणुन,
होता मनात ऊत्साह उल्लास आनंद..
तुझ्या जाण्याने माझ्या
होळीचा खेळ आता पडलाय बंद.
फिके पडले सारे
माझ्या आयुष्याचे रंग
जगन झाल तुझ्या विरहात
अश्रु वाहून वाहून बेरंग
माझ्या जिवनाच पार
वाटोळ करुन गेलीस तु.....
सप्तरंगातले सगले
रंग चोरुन नेलेस तु.....
ऊरला फक्त आता काळा कुट्ट रंग..
काळोखात एकट्याला सोडुन
गेलीस माझ्या साऱ्या अपेक्षा करुन भंग.

I Like SMS - Like: 73 - SMS Length: 1092
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

नाहीच वाटत आता,
तिला माझी थोडीही गरज.....
संपले सर्वकाही आमचे,
ती मला विसरली खरच.....
मी मेलो आहे की जिवंत,
याची विचारपुस ती नाही करत.....
होतीच खोटारडी बेवफा ती,
म्हणुनच तिला फरक नाही पडत.....
आता नाहीच आठवणार तिला,
नाहीच बसणार मी तिच्या आठवणीत रडत.....
जर तिला माझी नाही कदर,
तर मलाही तिची वाटत नाही गरज...

I Like SMS - Like: 56 - SMS Length: 761
« Previous 1 2 3 4 5 6 Next »
Jump to Page