Marathi Kavita

akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

गोड पाण्याचा
झरा आहेस तू ,
आकाशात चमकणारा
तारा आहेस तू ,
कातरवेळचा गुलाबी
वारा आहेस तू ,
अवतीभोवती दरवळणारा
मोगरा आहेस तू .

I Like SMS - Like: 55 - SMS Length: 324 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

सुंदर दिसतेस म्हणून,
तुला सारखं बघावस वाटत,
गोड हसतेस म्हणून,
सोबत तुझ्या हसावसं वाटत,
मधुर आवाज तुझा म्हणून,
सारखं तुला बोलावसं वाटत,
वेड लावणारं वागण तुझ म्हणून,
सोबत तुझ्या रहावस वाटत ...

I Like SMS - Like: 50 - SMS Length: 495 - Share
PRiya Posted In Marathi SMS
Added 2 years ago

ओल्या सांजवेळी,
उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची,
कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके,
पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे,
का सांग ना सारे जुने दुवे,
जळती जसे दिवे पाण्यावरी
जरा सोडून देऊया माझी ही आर्जवे,
पसरून काजवे जातील या नव्या वाटेवरी
तुझ्या रस्ता नवा शोधू जरा,
हातात हात दे पुसुया जुन्या पाउल खुणा सोबत
तुझी साथ दे वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे डोळ्यातल्या सरी
विसरून ये घरी ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला

I Like SMS - Like: 43 - SMS Length: 1433 - Share
PRiya Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेमात पडणं सोप्पं असतं
पण शेवटपर्यंत टिकवणं खूप अवघड असतं....
प्रेमात वचनं देणं सोप्पं असतं
पण ती निभावनं कठीण असतं....
प्रेमात दिवस–रात्र एकमेकांशी बोलणं सोप्पंअसतं
पण विरह सहन करणं अशक्य असतं....
प्रेम करणं सोप्पं असतं
पण प्रेम विसरणं शक्य नसतं....
प्रेमात जगण्यासाठी वचनं द्यायची असतात
पण शपथा देवून जीवाला बरं वाईट करून घेवू नकोस
असं म्हणायची वेळ येवून द्यायची नसते....
प्रेम जगण्यासाठी करायचं असतं
आणि प्रेमातच जगायचं असतं....
प्रेमासाठी मरून प्रेमाचा अपमान करायचा नसतो....
प्रेम प्रेम असतं
दोन हृदयानचं अतूट नातं असतं....
एकमेकांना समजून घ्यायचं असतं
आणि एकमेकांबरोबरच जगायचं असतं....
प्रेम प्रेम असतं
प्रेमाचं विश्वच वेगळ असतं
आणि त्या विश्वात एकदातरी जगायचं असतं
पण प्रेम मात्र शेवटपर्यंत जपायचं असतं....!!

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 1869 - Share
PRiya Posted In Marathi SMS
Added 2 years ago

जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असत
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असत
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट असत
कोणीतरी.

I Like SMS - Like: 47 - SMS Length: 862 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

आज मला खूप एकट वाटतय.,

कुणाच्या तरी जवळ
बसावस वाटतय...,

कोणाशी तरी खूप खूप
बोलावस वाटतय...,

अन मनात चाललेल सगळ
काही सांगावस वाटतय...

आज परत एकदा तिला
पहावस वाटतय...,

आज मला खूप खूप
रडावस वाटतय....,

स्वतःशी परत खूप
भांडावस वाटतय...,

भरलेल्या डोळ्याने...,

आरश्या समोर
बसावस वाटतय...,

अन् आपलं कोणीच
नाही म्हणून..स्वतःचेच
डोळे पुसावंस वाटतय...,

आज मला परत भूत-काळात
जावस वाटतय..परत एकदा
आठवणींत जगावस वाटतय..

I Like SMS - Like: 40 - SMS Length: 1040 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

माझा sms न वाचता
तो delete करणारी तू..

माझा call पाहता
तो cut करणारी तू..

मी समोर दिसता मला
न पहिल्या सारखं करून,
पुढे निघून जाणारी तू..

अन् पुढे गेल्यावर
हळूच मागे वळून
मला पाहणारी तू..

आपल्या breakup नंतर
आपल्याच मित्रान मध्ये
मला विसरण्याचा प्रयेत्न
करणारी तू..

अन् कोणी माझ्या बद्दल
काही विचारलं तर फक्त
गप्पा राहणारी तू..

माझी आठवण आल्यावर
चोरून रडणारी तू.. आणि,
जगा समोर गोड गोड हसणारी
तू..

रोज मला पाहून न पहिल्या
सारखा करणारी तू.. अन्
माझ्या हातात सिगारेट
पहिली कि, "सिगारेट तक खाली,
आणि घरी जा..असं फोने करून
बजावणारी सुधा तूच..

प्रेम असून हि नाही
असं भासवणारी तू..

अन् breakup नंतर सुद्धा
माझ्या वर जीव-पार, प्रेम
करणारी तू..

I Like SMS - Like: 39 - SMS Length: 1604 - Share
« Previous 1 2 3 4 5 6 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App