Marathi Prem SMS

akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

तुझी आठवण आता येत नाही मला
तुलाही मी आता आठवत नसेन

तरीही पाऊस पडला की बाहेर बघ
मी तुझीच वाट पाहत असेन.

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 267 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम म्हणजे मिळवण नाही,
प्रेम म्हणजे देण असत.
हे देण म्हणजे त्याग, दान काही नसत,
मनाने मनाला दिलेलं हे सोन असत.
ती आपली नाही म्हणून जग संपत नसत.
तिच्या सुखासाठी नाही,
तिच्या आठवणीतल्या हास्यासाठी
आपण आनंदी राहायचं असत.

I Like SMS - Like: 39 - SMS Length: 574 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम हि कल्पना असेल,
पण सुंदर आहे ना...
प्रेम हे वेडे असेल, पण गोड
आहे ना...
.
प्रेम हे वाईट असेल, पण
चांगला अनुभव आहे ना...
.
प्रेम वगेरे वगेरे असेल, पण
कधी तरी
वगेरे वगेरे शिकायला हवे

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 464 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम तर सगळेच करतात
पण माझ्यावर प्रेम करणारी ती काही वेगळीच आहे
हातात हात तर सगळेच देतात
पण मला हात देऊन
सावरणारी ती काही वेगळीच आहे
मांडीवर डोके तर सर्वच ठेवतात
पण प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणारी ती काही वेगळीच आहे
मिठीत तर सगळेच येतात...

I Like SMS - Like: 47 - SMS Length: 638 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

तू माझ्याशी नाही बोललीस मला दु:ख होणार नाही
तू माझ्याशी नाही हसलीस
मला राग येणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू नाही दिलास Reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास Phone
मला यातना होणार नाहीत
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू विसरलीस मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तू सोडून गेलीस मला
तरी मी वाट पाहणार
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन् तुझाच राहणार कारण तुला तर माहीतच
आहे
कि तुला सर्व माफ आहे...
तुला सर्व माफ आहे...

I Like SMS - Like: 45 - SMS Length: 1390 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

मनातले प्रेम चेह-यावर
दिसू देत नाहीस,
डोळ्यांनी बोलतोस पण
ओठांवर येऊ देत नाहीस,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू
... तरी कसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

फोनवर बरेच सांगतोस पण
प्रेमळ काहीच बोलत नाही
भेटीच्या तारखा ठरवतोस पण
भेटणे काही होतच नाही
आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

तुझ्यावर केलेली कविताही तू
वाचून नुसता हसतोस,
वाटतं काहीतरी बोलशील पण
"छान" बोलून गप्प बसतोस
प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक होशीलच कसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

आजारी असली जरी मी तरी
तू एकदाच फोन करतोस,
त्यातही तब्येत विचारायची सोडून
काहीतरीच बडबडत बसतोस,
आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

रागावलीच मी तर
तुला मुळीच करमत नाही,
माझ्याशी बोलल्या शिवाय
तुलाही राहवत नाही,
समजून घेते मी तुला कारण मला हि तू आवडतोस असा
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 2155 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

एक प्रेयसी पाहिजे,,
पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी. ... ♡
एक प्रेयसी पाहिजे,, फुलपाखरांमागे धावणारी; फुलांचे
सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी. ... ♡
एक प्रेयसी पाहिजे,, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी. ... ♡
एक प्रेयसी पाहिजे,,
कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी. ... ♡
एक प्रेयसी पाहिजे,,
जिवलग मैत्रीण असणारी; आमच्या नाजुक नात्याला,
हळुवारपणे जपणारी. ... ♡
एक प्रेयसी पाहिजे,,
माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. ... ♡
एक प्रेयसी पाहीजे,, प्रेमाला प्रेम समजणारी; सुखा-
दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी. ... ♡
एक प्रेयसी पाहीजे..

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 1576 - Share
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App